हिंदु साहित्यामध्ये वेगवेगळ्या विद्वानांनी सत्याची व्याख्या वेगवेगळी केली आहे. तेच सूत्र आज लागू केले आणि आजच्या संदर्भात ‘सत्य’ या शब्दाऐवजी ‘हिंदु’ हा शब्द घेतला, तर आजच्या तथाकथित विद्वानांकडून (नीच लोकांकडून) ‘हिंदु’ किंवा ‘हिंदुत्व’ या शब्दाचा अर्थ त्यांनी निर्माण केलेल्या कथानकाला योग्य होईल, अशा पद्धतीने घेतला जात आहे. त्यामुळे कट्टर इस्लामपंथीय (जिहादी), कट्टर ख्रिस्ती (क्रिप्टो ख्रिस्ती) आणि साम्यवादी (लाल रंगाच्या सर्व प्रकारच्या छटा असलेले) हे सर्व हिंदु अन् हिंदुत्व यांच्या स्वतःला योग्य वाटेल, असा अर्थ लावत आहेत. काही जण हिंदु धर्म पाळणार्यांना ‘काफीर’ म्हणून संबोधत त्यांना क्षुल्लक मानत आहेत.
१. राजकीय पक्षांकडून हिंदूंच्या पदरी कोरडेपणाच
सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू झाल्या आहेत आणि काही राजकीय पक्ष वेगवेगळी राजकीय हत्यारे वापरून हिंदु धर्मावर आक्रमण करत आहेत. दुसर्या बाजूने देवाला घाबरणार्या सर्वसामान्य हिंदूंचा धर्म, संस्कृती आणि परंपरा यांचा रक्षणकर्ता असून त्याच्या जीवनाचे सार आहे, असे दाखवणार्या भारतीय जनता पक्षावर त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून प्रश्नांचा भडीमार होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांची राजकीय शाखा मानला जाणारा ‘भारतीय जनता पक्ष या देशातील ८० टक्के हिंदूंना हिंदु धर्माचा रक्षणकर्ता आहे’, असे सांगत आहे.
सध्या ‘हिंदुत्वाचा ध्वज उंचावणारे’, असा दावा करणार्या काही राजकीय पक्षांनी बहुतांश हिंदूंना कोरडेच ठेवले आहे. खरे म्हणजे राजकीय पक्षाला सत्तेवर येण्यासाठी ज्या मतदारांच्या मतांची आवश्यकता असते; पण त्यांच्या भावनांशी खेळ केल्यासारखा होईल, अशी स्थिती आहे. रस्त्यावरील माणसाच्या दृष्टीने ‘हिंदु धर्म ही सर्वोच्च न्यायालय, हिंदुत्वनिष्ठ पक्ष आणि सामाजिक कार्य करणार्या संस्था यांच्या म्हणण्यानुसार एक जीवनशैली नसून पवित्र धर्म आहे.’ इस्लामी पाकिस्तानचा स्वीकार करणार्या मुसलमानांकडून हिंदूंचा झालेला नरसंहार राजकीय पक्ष विसरले असण्याची शक्यता आहे. या पक्षांना आठवण करून देणे आवश्यक आहे की, भारताची फाळणी झाली, तेव्हा किंवा त्यानंतर ‘भारत हे सर्वांसाठी ‘सेक्युलर’ (निधर्मी) राष्ट्र राहिल’, याविषयी कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही.
२. भारताला कायदेशीरपणे हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करणे आवश्यक !
राष्ट्राच्या इतिहासात अशी वेळ आली आहे की, राज्यघटनेची रचना आणि धोरण याचा राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने गंभीरपणे आढावा घ्यायला हवा. म्हणून प्रमाणापेक्षा अधिक असलेल्या अल्पसंख्यांक मुसलमानांकडून शत्रुत्वाची भावना वाढत जात आहे. त्यामुळे ‘हिंदु राष्ट्राविषयी निर्णय घेऊन आणि काय परिणाम होतील ? त्याला सामोरे जाऊन भारताला कायदेशीरपणे हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करणे’, आता आवश्यक आहे. शांतताप्रिय सनातनी हिंदूंची काहीही चूक नसतांना हिंदुत्वाच्या ध्येयाचा पराभव होऊ नये, यासाठी राजकीय पक्षांनी ढोंगी बनण्याऐवजी स्वतःच्या धोरणात पालट करावा.
– अधिवक्ता (डॉ.) एच्.सी. उपाध्याय, भाग्यनगर, तेलंगाणा.