वॉशिंग्टन – अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार श्री ठाणेदार यांच्या डेट्राइटस्थित कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. ठाणेदार यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या ‘पोस्ट’मध्ये ही माहिती दिली. त्यांनी तोडफोड केलेल्या कार्यालयाची छायाचित्रेही प्रसारित केली आहेत. या छायाचित्रांमध्ये कार्यालयाच्या भिंतींवर पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यासाठी घोषणा लिहिलेल्या दिसत आहेत. (यावरून कार्यालयाची तोडफोड करणारे कोण आहेत, हे सूज्ञ लोक जाणून आहेत ! – संपादक) या प्रकरणी श्री ठाणेदार यांच्या कार्यालयाच्या प्रवक्त्याने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.
ठाणेदार यांनी काही काळापूर्वी इस्रायल-हमास युद्धात इस्रायलला पाठिंबा दिला होता. तसेच हमास ही रानटी आतंकवादी संघटना असल्याचे म्हटले होते. त्यामुळे ठाणेदार हे पॅलेस्टाईन समर्थकांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांच्या कार्यालयावरील आक्रमणही पॅलेस्टाईन समर्थकांनी केल्याचे मानले जात आहे.
संपादकीय भूमिकाअमेरिकेतील असुरक्षित भारतीय ! जेथे भारतीय वंशाचे खासदार असुरक्षित असतील, तेथे सामान्य हिंदूंची काय स्थिती असेल, याचा विचाही न केलेला बरा ! |