तेल अविव – हमासच्या रॉकेट आक्रमणानंतर इस्रायलच्या सैन्यदलाने रफाहमध्ये हवाई आक्रमण केले. या आक्रमणात १६ जण ठार झाले. दक्षिण इस्रायलमधील केरेम शालोमजवळ हमासने आक्रमण केले होते. या आक्रमणात इस्रायलच्या संरक्षणदलाचे ३ सैनिक ठार झाले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने ही कारवाई केली.
इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले होते की, युद्ध मंत्रीमंडळाची ६ मे या दिवशी बैठक होईल आणि रहाफवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला जाईल. याआधी इस्रायलने हमासने केलेल्या आक्रमणात ३ इस्रायली सैनिक ठार आणि ९ जण घायाळ झाल्याची माहिती दिली होती. दक्षिण गाझा पट्टीतील रफाह शहरातून अंदाजे १० बाँब डागण्यात आले. हमासने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले होते, असे इस्रायलच्या सैन्यदलाने त्या वेळी प्रसारित केलेल्या एका निवेदनात म्हटले होते.