राष्ट्रीय ग्राहक मंचाकडून पीडित महिलेला न्याय !

१. पीडित महिलेला १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा जिल्हा ग्राहक मंचाचा आदेश

श्वेता खंडेलवाल या महिलेला नवी देहलीच्या ‘ऋषभ वैद्यकीय केंद्रा’मध्ये प्रसुतीसाठी भरती करण्यात आले होते. तेथे १३.९.२०१२ या दिवशी उषा जैन आणि ए. के. जैन या आधुनिक वैद्यांनी तिची ‘एल्. एस्. सिजरियन’चे शस्त्रक्रर्म केली. प्रसुतीनंतर ५ दिवसांनी तिला घरी सोडण्यात आले. श्वेता हिच्या पोटात अतिशय वेदना होत होत्या. त्यामुळे २३.९.२०१२ या दिवशी तिला नवी देहली येथील ‘स्टीफन हॉस्पिटल’मध्ये भरती केले. विविध चाचण्या केल्यावर तिच्या पोटात एक मोठा कापसाचा गोळा आढळून आला. तेथे दीड लिटर पसही जमा झालेला होता. त्यामुळे तिचे शस्त्रक्रर्म करावे लागलेी. हा सर्व प्रकार झाल्यानंतर तिला ११.१०.२०१२ या दिवशी घरी सोडण्यात आले. त्यानंतर महिलेने ‘वृषभ वैद्यकीय केंद्र’ आणि तेथील आधुनिक वैद्य यांविरुद्ध हानी भरपाईसाठीदावा प्रविष्ट (दा) ककेला. हा दावा जिल्हा ग्राहक मंचाने संमत केला आणि महिलेला १० लाख रुपये द्यावेत, असा आदेश दिला. त्या विरोधात रुग्णालय आणि इतर आधुनिक वैद्य यांनी राज्यस्तरीय ग्राहक मंचात आव्हान दिले. तेथे त्यांचा दावा संमत झाला.

(पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

२. पीडित महिलेला ५ लाख रुपये हानीभरपाई देण्याचा राष्ट्रीय स्तरावरील ग्राहक मंचाचा आदेश

त्यानंतर सदर महिला राज्यस्तरीय ग्राहक मंचाच्या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावरील ग्राहक मंचात गेली. तेथे आधुनिक वैद्यांनी सांगितले की, सदर महिलेच्या वर्ष २०१० च्या जानेवारी मासात राजस्थान येथे काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्या वेळेसच तिच्या पोटात कापसाचा गोळा राहिला असेल. ही गोष्ट रुग्ण महिलेने लपवून ठेवली आहे. त्यानंतर न्यायालयाने रूग्णाच्या शस्त्रक्रियेच्या संदर्भातील कागदपत्रे बोलावली. त्या वेळी न्यायालयाने ‘एक्स-रे’ आणि ‘सोनोग्राफी’ अहवाल पाहिले. त्यानुसार ती ज्या वेळेस साठी आली, त्या वेळी तिच्या पोटात काहीही नव्हते. तसे काही असते, तर महिलेला २ वर्षे अतिशय त्रास झाला असता. तसेच वृषभ रुग्णालयाने ताबडतोब ही गोष्ट महिलेला सांगून वेगळी शस्त्रक्रिया केली असती, असे लक्षात आले. यावरून ऋषभ रुग्णालयात शस्त्रकर्म झाले, तेव्हाच पीडितेच्या पोटात कापसाचा मोठा गोळा तसाच राहिला. त्यामुळे ‘त्याला कारणीभूत असलेले रुग्णालय आणि आधुनिक वैद्य यांनी पीडित महिलेला ५ लाख रुपये हानीभरपाई द्यावी’, असा आदेश न्यायालयाने केला. तसेच ‘शस्त्रकर्माच्या तारखेपासून ७ टक्के व्याज द्यावे’, असेही सांगण्यात आले.

या दोन्ही प्रकरणातून असे लक्षात येते की, आधुनिक वैद्य, भूलतज्ञ, रुग्णालये शस्त्रकर्म करतांना आणि नंतर रुग्णांना ज्या पद्धतीने हाताळतात, त्यात अनेक चुका आढळतात. त्यामुळे रुग्ण दगावतो किंवा त्याची शारीरिक हानी होते. त्यासाठी रुग्णालये आणि आधुनिक वैद्य हेच उत्तरदायी आहेत, असे या दोन्ही निकालपत्रांवरून लक्षात येते, तसेच रुग्णांची हानी झाल्यास त्यांना न्यायालयाकडे भरपाईसाठी दाद मागता येते आणि त्यात यश मिळू शकते, हेही लक्षात येते.’

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय