यंदाच्या गाळप हंगामात उसाच्या गाळपात कोल्हापूर विभाग प्रथम !

कोल्हापूर – यंदाच्या साखर कारखान्यांच्या उसाच्या गाळप हंगामात राज्यात १ सहस्र ६३ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून १ लाख ८९ सहस्र क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उत्पादनात कोल्हापूर विभाग प्रथम क्रमांकावर असून या विभागात २७८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

कोल्हापूर विभागाच्या खालोखाल पुणे विभागात २४६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. या हंगामात सहकारी आणि खासगी मिळून जवळपास २०७ साखर कारखाने चालू होते. त्यातील १९० कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात १ लाख ५२ सहस्र क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा मात्र त्यापेक्षाही अधिक साखरेचे उत्पादन झाले आहे.