नेहा हिरमेठची हत्या करणार्‍याला फाशी द्या ! – हिंदु राष्ट्र सेना

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे नेहा हिरेमठ हिला न्याय मिळण्यासाठी मोर्चा !

आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – नेहा हिरेमठ हत्या प्रकरण हा लव्ह जिहादचाच प्रकार असून काँग्रेस मतपेटीच्या राजकारणापायी हे सत्य नाकारत आहे. काँग्रेसचे नगरसेवक असलेले नेहाचे वडीलही या घटनेस ‘लव्ह जिहाद’ असे संबोधत आहेत. या प्रकरणी आरोपी फैयाज खोंडुनाईक याला फाशी द्यावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र सेनेचे कर्नाटक राज्य अध्यक्ष श्री. संदीप गुरुजी यांनी केली. ‘नेहाला न्याय मिळाला नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलने करण्यात येतील’, अशी चेतावणीही त्यांनी दिली. हिंदु राष्ट्र सेना आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून २६ एप्रिल या दिवशी येथे एक मोर्चा काढण्यात आला. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नेहा हिरेमठ हत्या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआयकडे सुपुर्द करण्याची मागणी

नेहा हिरेमठ हिच्या वडिलांची (सर्वांत उजवीकडे) भेट घेतांना संत आणि संदीप गुरुजी (सर्वांत डावीकडे)

नेहा हिरेमठ हिच्या हत्येनंतर संदीप गुरुजी आणि अन्य काही संत यांनी तिचे आई-वडील यांची भेट घेण्यासाठी हुब्बळ्ळी गाठले. या वेळी त्यांनी त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर वरील मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यासह दावणगेरे आणि कर्नाटकातील अन्य काही ठिकाणीही अशा प्रकारचे मोर्चे अन् भाषण यांचे आयोजन करून संदीप गुरुजी यांनी हिंदूंमध्ये जागृती करण्यासह कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. हिंदूंच्या एकत्रित दबावामुळे या प्रकरणी जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालवण्यात येण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाकडे याची चौकशी करण्यास कर्नाटक सरकारला भाग पाडले जाईल. नेहा हिरेमठ हत्या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआयकडे सुपुर्द करण्याची मागणीही संदीप गुरुजी आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांनी केली आहे.