देवाला आपल्याला जे द्यायचे आहे, ते देव देतोच असतो, त्यात स्वेच्छा नको !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे) : एखादे गीत गातांना, रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात विविध यज्ञयाग होत असतांना, तसेच अयोध्या येथील श्रीराममंदिरात श्री रामलल्लाची प्रतिष्ठापना होत असतांना मला सूक्ष्मातून काही दृश्ये दिसली. त्याविषयी मी लिहून दिले.

कु. अपाला औंधकर

तेव्हा प.पू. डॉक्टर, तुम्ही आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ सांगता की, ‘तुला सूक्ष्मातून अचूक ज्ञान मिळत आहे.’ प.पू. त्यासाठी मी आणखी कसे प्रयत्न करू ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुला आपोआप ज्ञान मिळत आहे ना ! तसेच चालू राहू दे. तू अशीच पुढे जाशील. ‘मला या विषयाची माहिती हवी, त्या विषयाची माहिती हवी’, अशी आपली स्वेच्छा नको. देवाला आपल्याला जे द्यायचे आहे, ते देव देईल.

कु. अपाला औंधकर : हो. परम पूज्य. माझ्या लक्षात येत नाही की, ‘देव हे ज्ञान देत आहे कि मी बुद्धीने विचार करत आहे.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले :  तो विचार करायला नको. ज्या ठिकाणी आपले उत्तर अचूक येते, ते देवानेच दिलेले असते. आपल्याला एवढ्या विषयांची माहिती नसते.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.