बडोदा, गुजरात येथील सौ. अलका वठारकर यांची वाराणसी येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. जया सिंह यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

 ‘सौ. अलका वठारकरकाकू बडोदा येथे त्यांच्या घरी राहून साधना आणि सेवा करतात. मी वाराणसीहून रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात शिकण्यासाठी आले होते. वठारकर काकूही स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेसाठी (टीप १) रामनाथी आश्रमात आल्या होत्या. काकू आमच्या सदनिकेत रहायला होत्या. तेव्हा त्यांच्याकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे खाली दिली आहेत.

(टीप १ : स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया : स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी दिवसभरात स्वतःकडून झालेल्या चुका वहीत लिहून त्यापुढे ‘त्या चुका कोणत्या स्वभावदोषांमुळे झाल्या ?’, ते लिहिणे आणि ‘तशा चुका पुन्हा होऊ नयेत’, यासाठी त्यापुढे योग्य दृष्टीकोनाच्या सूचना लिहून त्या दिवसातून १० – १२ वेळा अंतर्मनाला देणे)

सौ. अलका वठारकरकाकू

१. प्रेमभाव

कु. जया सिंह

अ. काकू स्वभावाने कडक आहेत; परंतु त्यांच्यामध्ये प्रेमभावही आहे. मधे जवळ जवळ १५ दिवस माझी प्रकृती ठीक नव्हती. त्या वेळी रात्री सदनिकेत आल्यावर त्या माझ्या प्रकृतीची प्रेमाने चौकशी करत असत.

आ. एके दिवशी मी औषध घेऊनही माझा ताप न्यून झाला नाही. तेव्हा त्यांनी स्वतःहून माझी कापराने दृष्ट काढली. त्यानंतर थोड्याच वेळात मला बरे वाटू लागले.

इ. सकाळी माझे नित्याचे आवरण्यास घाई होऊ नये, या दृष्टीने त्या मला वेळेवर उठवतात. त्यामुळे मला त्यांच्याविषयी आपुलकी वाटते.

२. व्यष्टी साधनचे गांभीर्य

काकू व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित करतात. त्या सकाळी लवकर उठून आणि दुपारी विश्रांतीला न जाता नामजपादी उपाय करतात. एके दिवशी त्यांना आश्रमात येण्यास विलंब झाला. तेव्हा निवासस्थानावर रात्री विद्युत्प्रवाह नसल्यामुळे अंधार होता. त्यामुळे त्यांना व्यष्टी साधनेचे लिखाण करणे शक्य नव्हते. तेव्हा काकूंनी दुसर्‍या दिवशी दुपारी वेळ काढून दैनंदिनी आणि व्यष्टी साधनेचे लिखाण केले. व्यष्टी साधनेचे लिखाण करण्यास विलंब झाल्याबद्दल त्यांनी क्षमायाचना केली.

३. इतरांचा विचार करणे

आम्ही खोलीत ४-५ साधिका रहातो. तेव्हा काकू ‘आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये’, असा प्रयत्न करतात. त्या आम्हाला अधून-मधून ‘त्यांच्या चुका लक्षात आल्या का ?’, असे विचारतात.

४. वेळेचे पालन करणे

काकू प्रत्येक कृती वेळेवर करतात, उदा. व्यष्टी साधनेचे लिखाण, नामजप, निवासस्थानावर येता-जाता ‘बस’च्या वेळेपूर्वी उपस्थित असणे, या कृती त्या अगदी वेळेतच करतात.

५. इतरांना साहाय्य करणे

काकूंना आमची काही चूक लक्षात आली, खोलीतही काही सूत्रे लक्षात आली किंवा कुणाची बोलण्याची पद्धत अयोग्य असल्याचे लक्षात आले, तर त्या अगदी सहजतेने सांगून आम्हाला साहाय्य करतात.

सौ. वाठारकरकाकूंची गुणवैशिष्ट्ये माझ्या लक्षात आणून दिली, त्याबद्दल परात्पर गुरुदेव (सच्चिदानंद परबह्म डॉ. आठवले) यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– कु. जया सिंह (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, वाराणसी. (६.१०.२०२३)