मालदीवच्या संसदीय निवडणुकीत भारतद्वेष्ट्या मुइज्जू यांच्या पक्षाला बहुमत !

माले (मालदीव) – मालदीवमध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत राष्ट्रापती महंमद मुइज्जू यांच्या पक्षाने विजय मिळवला आहे. ९३ पैकी ८६ जागांचे निकाल घोषित झाले असून त्यांतील ६६ जागा मुइज्जू यांच्या ‘पीपल्स नॅशनल काँग्रेस’ पक्षाला मिळाल्या आहेत.

या निवडणुकीवर भारत आणि चीन यांचे लक्ष होते. मुइज्जू चीन समर्थक असून भारतविरोधी आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा विजय भारतासाठी धक्का मानला जात आहे. या विजयामुळे पुढील ५ वर्षे मुइज्जू यांचे सरकार असणार आहे.

सौजन्य Navbharat Times

संपादकीय भूमिका 

मालदीवमधून ‘इंडिया आऊट’ची घोषणा देणार्‍या मुइज्जू यांना मालदीवच्या जनतेचेही समर्थन आहे, हे आता भारताने लक्षात घ्यायला हवे आणि मालदीव अन् तिच्या जनता यांना धडा शिकवण्याची धोरणे ठरवली पाहिजेत !