संपादकीय : कर्नाटकमध्ये लव्ह जिहाद !

काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ व त्यांची मुलगी नेहा हिरेमठ (डावीकडे) आरोपी फैयाज (उजवीकडे)

कर्नाटकमध्ये नेहा हिरेमठ या महाविद्यालयीन विद्यार्थिनीची फैयाज खोंडुनाईक या धर्मांधाने निर्घृण हत्या केली. नेहा ही काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी होती. मुख्य म्हणजे ही हत्या कुठे रस्त्यावर नाही, तर महाविद्यालयाच्या आवारातच करण्यात आली. तेथे विद्यार्थीही उपस्थित होते; मात्र कुणी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. असाच प्रकार गतवर्षी देहली येथे झाला होता. तेथे साक्षी नावाच्या हिंदु मुलीवर धर्मांध साहिलने भररस्त्यातच तिला गाठून तिच्यावर चाकूने सपासप वार तर केलेच; मात्र मोठे दगड तिच्या अंगावर घालून तिला पूर्णपणे छिन्नविछिन्न केले. या घटनेमुळेही देशाला हादरा बसला होता. येथेही रस्त्यावर ये-जा करणार्‍या कुणीही साक्षीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. उपस्थित सर्वांनी बघ्याची भूमिका घेतली. अशा घटनांमुळे मुली अन् महिला यांच्यासाठी समाज असुरक्षित झाला आहे, हे लक्षात येते. ‘दुर्जनांच्या दुर्जनतेहून सज्जनांची निष्क्रीयता अधिक घातक आहे’, असे बोधवाक्य आहे. ते अत्यंत खरे आहे. समाज निष्क्रीय रहातो किंवा त्याच्यातील संवेदनशीलता, माणुसकी संपत चालली आहे, असे म्हणता येईल.

नेहा यांच्या हत्येवरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. कर्नाटकमध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटना आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. निषेध मोर्चे, आंदोलने चालू आहेत. एक उच्चशिक्षित मुलगी नेहा यांनी फैयाज याचा लग्नाचा प्रस्ताव जाणीवपूर्वक नाकारला आणि त्याला वेगवेगळ्या जाती-धर्माचे असल्याने ते शक्य नाही, असे सांगितले होते. लव्ह जिहादच्या घटनांमध्ये काही हिंदु मुलींनी समोरील मुलगा मुसलमान आहे, हे ठाऊक असूनही त्याच्याशी प्रेमप्रकरण केले आणि लग्नगाठ बांधली. मुसलमान मुलाचे लग्नानंतरचे रूप पाहून मात्र त्यांच्या पायाखालची भूमीच सरकते किंवा स्वत: पूर्णपणे फसवले गेलो आहोत, हे लक्षात येते; मात्र तेव्हा पश्चात्ताप करण्याविना दुसरा मार्ग नसतो. ही धर्मांध मुले या हिंदु मुलीला नीट जगूही देत नाहीत, मरूही देत नाहीत. तिला मारहाण करणे, गोमांस खायला लावणे, कलमा पढायला लावणे, धर्मांतरित करणे, स्वत:च्या मित्रांसमवेत संबंध ठेवण्यास भाग पाडणे, तिचे अश्लील चित्रीकरण करून सामाजिक माध्यमांवर ठेवणे, तिला ब्लॅकमेल करणे अशा प्रकारे तिचे जीवन नरकमय बनवतात. काही धर्मांध मुले तर लग्नानंतर काही वर्षांमध्ये हिंदु मुलींच्या निर्घृण हत्याही करतात. असा घटनाक्रम न्यूनाधिक प्रमाणात धर्मांध मुलाशी विवाह करणार्‍या प्रत्येक हिंदु मुलीच्या आयुष्यात असतोच असतो. हा धोका नेहा यांनी जाणून आधीच धर्मांध मुलाला समजावले; मात्र धर्मांधाने शेवटी त्याची खुनशी वृत्ती दाखवून अभ्यासात हुशार असलेल्या नेहा यांचा जीव घेतला.

 

काँग्रेसची विकृत मानसिकता !

मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि निरंजन हिरेमठ

नेहा यांच्या या हत्येमुळे लव्ह जिहादचे स्वरूप पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. नेहा यांचे वडील निरंजन हिरेमठ यांनी या प्रकरणी ‘लव्ह जिहादमुळे मुलीची हत्या झाली’, असे सांगितले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी मात्र ‘हा लव्ह जिहादचा प्रकार नाही’, असे सांगितले. हा लव्ह जिहादचा प्रकार नाही, तर कुठला प्रकार आहे ? म्हणजे धर्मांधांनी हिंदूंच्या आया-बहिणींचा विनयभंग करायचा, हिंदु मुलींशी प्रेमाचे नाटक करायचे, त्यांना फसवायचे, उपभोग घ्यायचा आणि नंतर सोडून द्यायचे किंवा ठार करायचे. असे केले, तरी ‘धर्मांधांकडून काही झाले’, असे काँग्रेस म्हणणार नाही. धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केल्यावर, हिंदूंच्या संपत्तीची लूट केल्यावर, हिंदूंना मारहाण केल्यावरही काहीच न झाल्याप्रमाणे काँग्रेसी वागतात. उडुपी येथील एका हिंदु दुकानदाराने हनुमान चालिसा लावल्यामुळे धर्मांध तरुणांनी त्याच्यावर आक्रमण करून मारहाण केली, तर गुन्हे कुणावर नोंद झाले ? हिंदु दुकानदारावरच ! आश्चर्य येथेच आहे.

धर्मांधांनी काही केले, तरी हिंदूच गुन्हेगार ठरतात ! काँग्रेसच्या स्थापनेपासूनच तिची मानसिकता आहे. परिणामी काश्मीर असो, बंगाल असो, मेवात (हरियाणा) असो, केरळ असो, नवी देहली असो, येथे काँग्रेस सत्तेत असतांना अथवा काँग्रेसचा प्रभाव असतांना हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले आणि आताही काँग्रेसच्या राज्यात अत्याचार होत आहेत. धर्मांधांना पाठीशी घालण्याची, त्यांचे लाड करण्याची, लांगूलचालन करण्याची काँग्रेसी मानसिकता कारणीभूत आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हा मुस्लिम लीगचा जाहीरनामा आहे’, असे त्याविषयी भाष्य केले. यावरून काँग्रेस अजूनही कुठल्या मध्ययुगीन काळात जगत आहे कि काय ? असे वाटते.

केरळ येथील हिंदु आणि ख्रिस्ती मुलींना फसवून त्यांची ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेत भरती करण्याचे स्वरूप दाखवणारा, हिंदु मुलींची दीन अवस्था दाखवणारा, धर्मांधांचे हिंदूंविरुद्धचे खरे स्वरूप उघड करणारा ‘द केरल स्टोरी’ चित्रपट केरळ येथे दाखवण्यास तेथील साम्यवादी सरकारने विरोध केला. त्यामुळे तेथे तो तुरळक चित्रपटगृहांमध्येच दाखवण्यात आला. अगदी याच महिन्यात तेथील कॅथॉलिक ख्रिस्त्यांच्या युवांच्या संघटनेने केरळ येथे हा चित्रपट दाखवण्याचे दायित्व घेतले. त्याला विरोध झाला; मात्र तो चित्रपट दाखवणे चालू आहे. हा चित्रपट हिंदुत्वनिष्ठ सोडून केरळमध्ये प्रदर्शित करण्यास सरकारसह सर्वांचा विरोध होता. ख्रिस्ती संघटना आता सिद्ध झाल्या; कारण ख्रिस्ती मुलीही धर्मांधांच्या लव्ह जिहादमध्ये फसून त्यांचे धर्मांतर करण्यात येत आहे. काही साम्यवाद्यांच्या मुलीही पळवण्यात आल्यामुळे तुरळक साम्यवादी जागृत झाले, तरी साम्यवादी केरळ सरकार याविषयी गंभीर नाही, तोच भाग काँग्रेसचा आहे. देहली येथे काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या घरातही लव्ह जिहाद घडला आहे ! ही काँग्रेसी मानसिकता आहे.

कर्नाटकमधीलच एक घटना सर्वांना स्पष्टपणे आठवत असेल. तेथील एका पबमध्ये मद्यपान करत असलेल्या मुलींना श्री. प्रमोद मुतालिक यांच्या श्रीराम सेना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समजावत बाहेर काढले होते, ज्या मुली ऐकत नव्हत्या, त्यांना बळजोरीने बाहेर काढण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. येथे स्त्रीरक्षणाचा प्रयत्न एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केल्यावर त्याला लागलीच ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला, मुलींच्या स्वातंत्र्यावर आक्रमण’, असे लेबल लावण्यात आले. मुलींना वाईट मार्गापासून परावृत्त करण्याचा हा प्रयत्न होता; मात्र गुन्हे कार्यकर्त्यांवरच नोंदवण्यात आले. असे असल्यास मुलींच्या रक्षणासाठी कोणती सामाजिक, राष्ट्रीय संघटना पुढे येणार ? सरकार आणि पोलीस-प्रशासन हे मुली, महिला यांचे रक्षण करण्यासाठी असमर्थ ठरल्यामुळेच संघटनांची आवश्यकता निर्माण होते. राष्ट्रीय स्तरावर लव्ह जिहादविरोधी कायदा निर्माण करण्यासह हिंदूंमध्ये जागृती करणे, स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षित करणे, ही काळाची आवश्यकता आहे.

नेहा हिरेमठ यांची धर्मांधाने केलेली लव्ह जिहादमधील हत्या शेवटची ठरण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी प्रयत्न करणे आवश्यक !