Congress Calls Naxals Martyars : सैनिकांनी जीव धोक्यात घालून ठार मारलेल्या २९ नक्षलवाद्यांना काँग्रेसने संबोधले ‘हुतात्मा’!

रायपूर – छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त कांकेर जिल्ह्यातील हिदूर आणि कालपर गावांच्या जंगलात नुकतेच सुरक्षादलाचे सैनिक आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २९ नक्षलवादी ठार झाले होते. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी नक्षलवाद्यांना ‘हुतात्मा’ संबोधले आणि या चकमकीचे सखोल अन्वेषण होणे आवश्यक आहे, असे म्हटले होते.

या पार्श्‍वभूमीवर भाजपचे गौरव भाटिया यांनी काँग्रेस प्रवक्त्यांच्या वक्तव्याविषयी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. ‘काँग्रेसच्या प्रवक्त्या या नक्षलवाद्यांना ‘हुतात्मा’ म्हणत आहेत. याला मानसिक आणि नैतिक दिवाळखोरी म्हणतात’, असे भाटिया यांनी म्हटले आहे.

सौजन्य : TIMES NOW

भाजपकडून श्रीनेत यांच्यावर टीकेची झोड

सुप्रिया श्रीनेत यांच्या वक्तव्यावरून भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. भाजपने ‘एक्स’वर श्रीनेत यांच्या विरोधात ‘हॅशटॅग’ (एकाच विषयावर चर्चा घडवून आणणे) चालू करून त्यांच्यावर टीका केली आहे.

संपादकीय भूमिका 

  • अशा काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी राष्ट्रप्रेमींना या निवडणुकीत संधी आहे. ती त्यांनी गमावू नये !
  • जिहादी आतंकवादी, नक्षलवादी आणि धर्मांध यांचे उदात्तीकरण करणार्‍या काँग्रेसने भारतावर सर्वाधिक राज्य केले, हे लज्जास्पद !