प्रेमळ आणि तळमळीने सेवा करणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. मनीषा गायकवाड आणि सौ. श्रावणी परब !

सौ. मनीषा गायकवाड आणि सौ. श्रावणी परब यांची साधिकेच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सौ. श्रावणी परब

१. नम्रता

‘माझ्याकडून कधी कधी उत्तरदायी साधिका सौ. मनीषा गायकवाड आणि सौ. श्रावणी परब यांना प्रतिक्रियात्मक बोलले जाते; पण त्या कधीही दुसर्‍यांना उलट बोलत नाहीत.

२. इतरांचा विचार करणे

सौ. मनीषा गायकवाड

दुपारी काही साधक धान्य साठवण्याच्या ठिकाणी सेवा करतात. तेथे विश्रांतीसाठी अल्प वेळ मिळतो. सौ. मनीषाताई आणिसौ. श्रावणीताई या दोघी सर्व सेवा पूर्ण करूनच विश्रांती घेण्यासाठी जातात. त्या विश्रांती घेत असतांना त्यांना साधकांचे सेवेसंबंधी भ्रमणभाष येतात आणि त्यांना विश्रांती घेण्यासाठी वेळ अल्प मिळतो, तरीही ‘विश्रांतीच्या वेळेत मला नामजपादी उपाय आणि स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत सारणी लिखाण करण्यासाठी वेळ मिळावा’, यासाठी त्या मला दुपारी जेवणानंतर आवरण्यात साहाय्य करतात.

३. प्रेमभाव

कु. सिद्धी गावस

अ. त्या साधकांच्या वैयक्तिक अडचणी आईच्या मायेने जातीने लक्ष देऊन सोडवतात. त्यांची सहसाधकांना सांभाळून घेण्याची तळमळ दिसून येते.

आ. त्यांना स्वतःलाही वैयक्तिक आणि सेवेच्या स्तरावर अडचणी असतात. त्यांना साहाय्य हवे असते; पण त्या साधकांची स्थिती स्वीकारून त्यांना दिशा देऊन स्वतःकडे न्यूनता घेऊन सर्व गोष्टी सहजतेने करतात.

४. सेवेची तळमळ

अ. त्या कितीही दमलेल्या असल्या, तरी नियोजित वेळेतच सेवेला आरंभ करतात.

आ. दोघींनाही काही वेळा रात्री उशिरापर्यंत सेवेनिमित्त भ्रमणभाषवर समन्वय करावा लागतो. दोघींनाही शारीरिक त्रास आहे. त्यांची पुरेशी झोप होत नाही, तरीही त्या दिवसभर झोकून देऊन सेवा करतात.

५. अल्प अहं

त्यांच्यात दायित्व सांभाळतांना कुठेही श्रेष्ठत्वाची भावना दिसत नाही. त्या दोघी ‘साधकांची प्रगती व्हावी’, यासाठी सतत पुढाकार घेतात.’

– कु. सिद्धी गावस, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.४.२०२४)