तीव्र आध्यात्मिक त्रासांशी लढून परिपूर्ण सेवा करणारे आणि स्वतःचे स्वभावदोष दूर करण्यासाठी प्रयत्न करणारे मथुरा सेवाकेंद्रातील श्री. श्रीराम लुकतुके (वय ४३ वर्षे) !

‘चैत्र शुक्ल दशमी (१८.४.२०२४) या दिवशी सनातनच्या मथुरा सेवाकेंद्रात पूर्णवेळ साधना करणारे श्री. श्रीराम लुकतुके यांचा ४३ वा वाढदिवस आहे. यानिमित्त श्रीरामदादांची साधकांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत.

श्री. श्रीराम लुकतुके

श्री. श्रीराम लुकतुके यांना ४३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

१. कु. पूनम चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ. मनमोकळेपणा : ‘श्रीरामदादा स्वतःच्या मनात आलेले विचार सहसाधकांना मनमोकळेपणाने सांगतात.

१ आ. सेवेसाठी तत्पर असणे : दादांची प्रकृती नाजूक असूनही ते दूरचा प्रवास करून प्रसाराला जातात. ‘माझी प्रकृती ठीक नाही आणि मी सेवा करू शकणार नाही’, असे दादा कधीच सांगत नाहीत. ते नेहमीच सेवेसाठी तत्पर असतात.

१ इ. स्वतःचे स्वभावदोष दूर करण्यासाठी चिंतन करून कृतीच्या स्तरावर प्रयत्न करणे : श्रीरामदादाने सेवाकेंद्रातील साधकांना स्वतःच्या चुका विचारून घेतल्या. साधकांनी सांगितलेले स्वभावदोष दूर करण्यासाठी त्यांनी चिंतन करून कृतीच्या स्तरावर प्रयत्न केले आणि त्यांनी स्वतःमध्ये पालट करायला आरंभ केला. दादांच्या या गुणाचे सद्गुरु पिंगळेकाकांनी कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘साधकांनी स्वतःमध्ये पालट करणे, ही साधनेतील फार महत्त्वाची गोष्ट आहे.’’

१ ई. दादांनी त्यांच्या संपर्कात आलेले धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना चांगल्या प्रकारे जोडून ठेवले आहे.

२. श्री. प्रणव मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४४ वर्षे)

२ अ. श्रीरामदादा हे मितभाषी आहेत. आपली सेवा व्यवस्थित आणि परिपूर्ण करण्यासाठी ते सतत प्रयत्न करतात.

२ आ. स्वतःचे जीवन साधनेसाठी समर्पित करणे : दादा तंत्रज्ञ क्षेत्रात एका उच्च पदावर कार्यरत होते. त्यांना चांगले वेतन होते; परंतु साधनेचे महत्त्व समजल्यावर त्यांनी नोकरीचा त्याग केला आणि ते पूर्णवेळ साधना करू लागले. त्यांनी स्वतःचे जीवन साधनेसाठी समर्पित केले.

२ इ. घराविषयी अत्यल्प आसक्ती असणे : त्यांचे वडील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. रमेश लुकतुके मिरज आश्रमात सेवारत आहेत आणि आई कोल्हापूर येथे आहे. दादांची पत्नी आणि मुलगा हे सुद्धा केरळ येथील कोचीन सेवाकेंद्रात राहून साधना करतात. कुटुंबातील सर्व जण वेगवेगळ्या ठिकाणी सेवेसाठी रहात असूनही ते वर्षभरात कधीतरी एका ठिकाणी येऊन राहिले, असे कधीच झाले नाही. ते कधीतरी कोचीन सेवाकेंद्रात पत्नी आणि मुलगा यांना भेटायला जातात.

२ ई. श्रीरामदादा अत्यंत एकाग्रतेने सेवा करतात. त्यांना सेवेतील लहान लहान बारकावे ठाऊक असतात. त्यामुळे ते प्रत्येक सेवा पूर्ण समजून घेऊन गुरुदेवांना अपेक्षित अशीकरण्याचा प्रयत्न करतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने तीव्र आध्यात्मिक आणि शारीरिक त्रासांशी लढून सेवा कशी करावी, हे श्री. श्रीरामदादांकडून सतत शिकायला मिळते. अनेक गुणांनी युक्त असलेल्या श्रीरामदादांसह सेवा करतांना पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या. यासाठी आम्ही गुरुदेवांच्या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

(वरील सर्व सूत्रांचा दिनांक ७.४.२०२४ आहे.)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे
निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.