रथोत्सवानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले रथात बसले असल्याचे कळल्यावर श्री. आकाश श्रीराम यांना आनंद होऊन कृतज्ञता वाटणे 

श्री. आकाश श्रीराम

‘२२.५.२०२२ या दिवशी दिंडी चालू झाली. मला पुष्कळ वेळ ठाऊक नव्हते की, परात्पर गुरु डॉ. आठवले दिंडीतील रथात येऊन बसले आहेत; पण मला सातत्याने जाणवत होते की, मी डोक्यावर गुरुपादुका घेऊन चालत आहे आणि मला त्यांचे अस्तित्व सतत जाणवत होते. नंतर शेवटी मला समजले की, परात्पर गुरु डॉ. आठवले रथात बसले आहेत. मला साक्षात् विष्णूचे अवतार असलेल्या परात्पर गुरुदेवांच्या रथोत्सवात आणि त्यांच्या सहवासात दिंडीत सहभागी होण्याचे परमभाग्य लाभले. ‘त्यांच्या सान्निध्यातील हे सुवर्णक्षण देवाने मला अनुभवण्यास दिले’, या जाणिवेने मला पुष्कळ कृतज्ञता वाटून आनंद झाला. रथोत्सव संपल्यावरही पुढे ३ – ४ दिवस त्यांचे रथामधील ते दिव्य रूप सतत डोळ्यांसमोर येत होते आणि आनंद होत होता.’ – श्री. आकाश श्रीराम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२६.५.२०२२)