Britain Murder Case : ब्रिटनमध्ये वाहनचालकाच्या हत्येच्या प्रकरणी भारतीय वंशाच्या ४ जणांना जन्मठेपेची शिक्षा

लंडन (ब्रिटन) – गेल्या वर्षी श्रुसबरी येथे एका वाहनचालकाच्या हत्येच्या प्रकरणी भारतीय वंशाच्या ४ जणांना ब्रिटनच्या न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तर अन्य एका आरोपीला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने सांगितले की, या ४ दोषींनी कुर्‍हाड, हॉकी स्टिक आणि फावडा यांद्वारे हत्या केली, तर पाचव्या आरोपीने केवळ माहिती गोळा केली.