नवी मुंबई, ११ एप्रिल (वार्ता.) – नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाने प्रवासी भाडे नाकारणार्या एका दिवसात विशेष मोहीम राबवून १३८ रिक्शाचालकांवर कारवाई केली आहे. बेशिस्त रिक्शाचालकांना वठणीवर आणण्यासाठी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
नवी मुंबई कार्यक्षेत्रात काही रिक्शाचालक वाहतुकीचे नियम न पाळता दायित्वशून्यपणे रिक्शा चालवतात. त्या अनुषंगाने नवी मुंबई वाहतूक विभागाकडून रिक्शा युनियन नेते, तसेच रिक्शा मालक/चालक यांची बैठक आयोजित केली होती. यात रिक्शाचालकांनी वाहतुकीचे नियम पाळण्याविषयी सूचना दिल्या होत्या. तरीही काही रिक्शाचालक नियमांची पायमल्ली करून दायित्वशून्यपणे रिक्शा चालवणे, भाडे नाकारणे करत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. रिक्शाचा बॅच नसलेले, बॅच न दाखवणारे, स्टँडच्या बाहेर रिक्शा उभी करणारे, प्रवासी भाडे नाकारणे, जादा भाडे आकारणे तसेच जादा प्रवासी घेऊन प्रवास करणारे यांच्यावर कारवाई करण्यात आली.
संपादकीय भूमिका :सर्व ठिकाणी नेहमीच ही कारवाई चालू रहावी ! |