साधकांनो, ‘सेवेसाठी घेतलेले साहित्य सेवा झाल्यानंतर जागेवर ठेवणे’, ही साधना आहे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘साधक सेवेसाठी घेतलेले साहित्य आणि उपकरणे सेवा झाल्यानंतर जागेवर ठेवत नाहीत. साधकांनी सेवेसाठी लागणारे साहित्य सेवा पूर्ण झाल्यानंतर जागेवर ठेवल्यानंतरच त्यांची सेवा परिपूर्ण होते. साधकांनी एखादे साहित्य जागेवर न ठेवल्यास आणि नंतर कुणाला ते साहित्य हवे असल्यास संबंधित साधकाचा ते साहित्य शोधण्यात वेळ जातो, तसेच साधकांनी साहित्य अव्यवस्थित ठेवल्यास तेथून स्पंदनेही चांगली येत नाहीत. साधकांनो, सेवेसाठी घेतलेले साहित्य सेवा झाल्यानंतर मूळ जागी व्यवस्थितरित्या ठेवणे, ही साधनाच आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले