‘मार्च २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले रहात असलेल्या खोलीच्या वरच्या मजल्यावर बांधकामाची दुरुस्तीची सेवा चालू होती. तेथे लादी बसवणे, भिंतींना छिन्नीने ठोकून छिद्र करणे यांसारखी मोठा आवाज करणारी कामे चालू होती. त्या काळात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना खूप थकवा असल्यामुळे त्यांचा दिवसाही विश्रांतीचा काळ अधिक होता. असे असले तरी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कधीच ‘आता मी झोपत आहे. कामगारांना काम नंतर करण्यास सांगा’, असे सांगितले नाही. त्या आवाजातच ते झोपत होते.’
– सेवेतील साधक (६.४.२०२३)