मुंबई – मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात घरफोड्या करून विमानाने गौहत्तीला पळून जाणार्या मोईनुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम या दरोडेखोराला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोईनुद्दीन याने आतापर्यंत २२ घरफोड्या केल्याचे पोलीस अन्वेषणात उघड झाले आहे.
Abdul Mallik, who broke into 22 Mumbai homes, used to flee by plane; arrested
⚠️ Minority by population in the country, but in fact a majority in crime !#CrimeNews #MumbaiNews pic.twitter.com/YJj8VxiAQL
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 11, 2024
मोईनुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम हा मूळचा आसाम येथे रहाणारा आहे. गौहत्ती येथून घरफोडी करण्यासाठी तो मुंबईला विमानाने येत असे. घरफोडी करून तो पुन्हा विमानाने आसाम येथे जात असे. ठाणे येथील नारपोली येथे घरफोडी करून मोईनुद्दीन विमानाद्वारे गौहत्ती येथे गेला असतांना त्याचा माग घेत मुंबई पोलीस गौहत्तीला गेले आणि तेथे त्याला अटक केली. या वेळी त्याच्याकडे ६२ लाख रुपयांचे ८९ तोळे सोने सापडले. वर्ष २०२२ मध्ये मोईनुद्दीन याला नवी मुंबई येथे अटक करण्यात आली होती. त्या वेळी त्याने ७ घरफोड्या केल्याचे मान्य केले होते. (त्याच वेळी त्याच्यावर कठोर कारवाई झाली असती, तर आज तो २२ घरफोड्या करण्यास धजावला नसता ! – संपादक)
संपादकीय भूमिकासमाजात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! |