१०.९.२०२३ या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक शिबिर झाले. त्या वेळी साधिकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. सौ. आरती म्हैसकर, बांदा
१ अ. शिबिरात भावार्चना चालू असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे आणि भावजागृती होणे
१. ‘शिबिरात भावार्चना चालू असतांना मला तिथे गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आल्याचे जाणवले आणि त्यांच्या दर्शनाने माझी भावजागृती झाली.
२. ‘गुरुदेव आसंदीत बसलेले आहेत. ते सर्व साधकांकडे बघून स्मितहास्य करत आहेत आणि साधकांकडे बघून तेथे असलेल्या सद्गुरु सत्यवान कदम यांना काही तरी सांगत आहेत’, हे दृश्य मला बराच वेळ दिसले आणि ते पाहून माझी भावजागृती झाली.
१ आ. माझे मन एकदम शांत आणि निर्विचार झाले होते.
१ इ. माझ्याकडे वातावरणातून थंड लहरी येत होत्या.
१ ई. शेवटी कृतज्ञता व्यक्त करतांना गुरुमाऊलीचे पुन्हा दर्शन झाले आणि त्यांचे अस्तित्व अनुभवले.’
२. सौ. प्राजक्ता सावंत, कणकवली
२ अ. श्री. मणेरीकर यांच्या पाठीमागे व्यासपिठावर निळ्या रंगांचे अनेक लहान ॐ दिसणे आणि त्या ॐ ची वलये संपूर्ण सभागृहात पसरलेली जाणवणे अन् तेव्हा मनाला शांत वाटणे : ‘शिबिराच्या दुपारच्या सत्रात श्री. हेमंत मणेरीकर यांचे मार्गदर्शन, तसेच चर्चात्मक संवाद चालू असतांना श्री. मणेरीकर यांच्या पाठीमागे व्यासपिठावर निळ्या रंगांचे अनेक लहान ॐ दिसत होते. त्या ॐ ची वलये संपूर्ण सभागृहात पसरलेली मला जाणवली. तेव्हा माझ्या मनाला पुष्कळ शांत वाटत होते.
२ आ. ‘वातावरणात गारवा पसरत आहे’, असेही जाणवले. ‘त्यामुळे सर्वांचा उत्साह वाढला आहे’, असे लक्षात आले.
२ इ. कृतज्ञता : गुरुदेवांच्या कृपेमुळे मला ही चैतन्यदायी अनुभूती आली, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
(सर्व लिखाणाचा दिनांक : सप्टेंबर २०२३)
या लेखात कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |