एकदा एका साधकाची बहीण गाडीवरून पडली; म्हणून त्याचे आश्रमात सेवेसाठी येण्याचे रहित झाले होते. या प्रसंगाविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात शिकायला मिळालेले सूत्र पुढे देत आहे.
मी : गुरुदेव, बर्याच साधकांचे अपघात होत आहेत किंवा त्यांना काही ना काही त्रास होत आहेत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आता आपत्काळ आला आहे. त्यामुळे नामजप करायला हवा. वाहन चालवतांना आपला नामजप व्हायला हवा. त्यामुळे आपल्याला होणारा अपघात किंवा त्रास यांची तीव्रता अल्प होईल. ते टळू शकतील. मी खोलीत झोपून असतो. तेव्हा मीसुद्धा नामजप करतो.
यावरून आपल्याला भीषण आपत्काळात टिकून रहायचे असेल, तर ‘देवाला अधिकाधिक आळवणे, जप करणे, आपल्या हातात जे क्रियमाण आहे, ते करणे इत्यादी विचार गांभीर्याने करायला हवे’, हे स्पष्ट होते. साक्षात् भगवंत नामजप करतो, तर आपण त्याच्याकडून शिकून वाहन चालवतांना, तसेच घराबाहेर सेवेसाठी किंवा काम करायला जातांना सतत नामजप करूया.’
– सौ. रोहिणी वाल्मिक भुकन (वय २७ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.