सामूहिक गुढी उभारण्याच्या वेळी करावयाची प्रतिज्ञा

गुढीला वंदन करतांनाचे ( प्रतिकात्मक छायाचित्रं )

‘आम्ही समस्त हिंदू गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केवळ भारतातच नव्हे, तर पृथ्वीवर सर्वत्र हिंदु धर्म प्रस्थापित करून अखिल मानवजातीला सुसंस्कृत आणि सुख-समृद्धीयुक्त जीवन देण्याचा निश्चय करतो. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आम्ही सदैव ढाल बनून उभे राहू. देव, धर्म, संत आणि राष्ट्रपुरुष यांच्या होणार्‍या विडंबनाला तीव्र विरोध करू. व्यष्टी साधना, म्हणजे नामजपादी धर्माचरण करू आणि समष्टी साधना, म्हणजे राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करून हिंदु धर्माची पताका संपूर्ण विश्वभर फडकवू.’ अशी आम्ही ब्रह्मध्वजासमोर प्रतिज्ञा करतो.