कठुआ (जम्मू-काश्मीर) – येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाजवळ वासुदेव या गुंडाबरोबर झालेल्या चकमकीत २ पोलीस अधिकारी घायाळ झाले. यांतील दीपक शर्मा नावाच्या उपनिरीक्षकाचा उपचार चालू असतांना मृत्यू झाला. या चकमकीत गुंडाला ठार करण्यात आले. राज्याचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली. ‘आमच्या हुतात्म्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा सूड घेतला जाईल आणि आम्ही भयमुक्त जम्मू-काश्मीर निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत’, असे ते म्हणाले.