सांगलीत ‘लँड जिहाद’ संदर्भात कुणाची तक्रार असल्यास संपर्क साधण्याचेही केळकर यांचे आवाहन
सांगली – सह्याद्रीनगर येथील ७५ वर्षांच्या पुष्पा बाळासाहेब कबाडे या वयोवृद्ध हिंदु महिलेच्या भूमीवर युनूस जमादार या धर्मांधाने अतिक्रमण केले. या संदर्भात पुष्पा कबाडे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. यावर युनूस यानेही ‘कबाडे यांच्या कुटुंबियांनी शिवीगाळ केली’, अशी खोटी तक्रार दिली. तेथील पोलीस निरीक्षकांना दूरभाष करून वस्तूस्थिती लक्षात आणून दिल्यावर युसून याच्याविरुद्ध ‘ट्रेस पासिंग’चा (अनुमतीविना एखाद्याच्या भूमीत अथवा मालमत्तेवर अतिक्रमण करणे) गुन्हा नोंदवण्यात आला. आता हे अतिक्रमण हटवण्यात आले आहे. सांगलीत ‘लँड जिहाद’च्या संदर्भात कुणाचीही तक्रार असल्यास माझ्याशी किंवा हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन शिंदे यांच्याशी संपर्क साधावा; आम्ही संबंधितांना न्याय मिळवून देऊ. आम्ही ‘लँड जिहाद’ संपवल्याविना शांत बसणार नाही, असे विधान भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्या सौ. निता केळकर यांनी येथे केले.
१. युनूस जमादार याला प्रारंभी पोलीस ठाण्यात बोलावून घेतल्यावर ‘मी अतिक्रमण हटवतो’, असे सांगून तो निघून गेला आणि लगेच दुसर्या दिवशी पुष्पा कबाडे यांची विधवा सून अन् नातू यांच्या विरोधात शिवीगाळ केल्याची खोटी तक्रार संजयनगर पोलीस ठाण्यात दिली. या संदर्भात मी तेथील पोलीस निरीक्षकांच्या वस्तूस्थिती लक्षात आणून दिल्यावर युनूस याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
२. नंतर युनूस याला परत पोलीस ठाण्यात बोलावल्यावर ‘मला अधिवक्त्यांचा सल्ला घ्यावा लागेल’, असे उद्दामपणे सांगून निघून गेला. युनूस जमादार याच्याकडे असलेल्या एका वटमुख्यारपत्राच्या आधारे तो मालमत्तेवर अधिकार सांगण्याचा प्रयत्न करत होता.
३. यानंतर त्या जागेवर युनूस याने केलेले अतिक्रमण जेसीबी यंत्राद्वारे हटवण्यात आले. हे अतिक्रमण जर वेळीच हटवले नसते, तर युनूस न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवण्याच्या प्रयत्नात होता. यासाठी त्याला साहाय्य करण्यासाठी अधिवक्त्यांचा फौजफाटा सिद्ध होता.
४. सांगली शहरात जे असे निराधार आणि असाहाय्य आहेत, त्यांच्या परिस्थितीचा अपलाभ उठवून हिंदूंच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भूमी हडप करण्याचा षड्यंत्र चालू आहे.
‘लँड जिहाद’च्या विरोधात सातत्याने आवाज उठवणारे नितीन शिंदे !गेले काही दिवस झाले सांगली आणि उपनगर परिसरात धर्मांधांकडून हिंदूंच्या भूमी बळकावण्याचे काम चालू आहे. हिंदूंनी तेथून निघून जावे, यासाठी त्यांना मारहाणही केली जात आहे. या विरोधात पत्रकार परिषद, आंदोलन, मेळावे, निवेदन आदींच्या माध्यमातून हिंदूंच्या बाजूने हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन शिंदे सातत्याने आवाज उठवत आहेत. या संदर्भात नुकतेच शुभम कुदळे कुटुंबियांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात ते लढत आहेत. पुष्पा बाळासाहेब कबाडे यांना भेटून श्री. शिंदे यांनी धीर दिला आणि कोणतीही अडचण आल्यास पाठीशी असल्याचे आश्वासन दिले. तेथील अतिक्रमण हटवेपर्यंत त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. या वेळी प्रणोती अभ्यंकर, शहर जिल्हाध्यक्ष श्री. संजय जाधव, विभागअध्यक्ष श्री. अवधूत जाधव, यांच्यासह सर्वश्री वेदांग कबाडे, आेंकारेश्वर अभ्यंकर, अरुण अभ्यंकर, अनिरुद्ध कुंभार, रणजित पेशकर आदी उपस्थित होते. |