परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साधनेविषयी विचारलेले काही प्रश्न आणि त्यांची त्यांनी दिलेली उत्तरे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

डॉ. रवींद्र भोसले : स्वयंसूचना सत्र करण्याऐवजी केवळ प्रार्थना केली, तर स्वभावदोष घालवता येतील का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : स्वयंसूचना ही बुद्धीच्या, तर प्रार्थना ही मनाच्या पातळीवर कार्य करते. त्यामुळे स्वयंसूचना सत्र करणे अधिक प्रभावी आहे.

डॉ. रवींद्र भोसले

डॉ. रवींद्र भोसले : अनिष्ट शक्ती मनुष्याच्या शरिरातील स्थान वारंवार पालटते. त्यामुळे प्राणशक्तीवहन उपायपद्धतीनुसार नामजप शोधतांना ते स्थान वारंवार शोधण्यात वेळेचा अपव्यय होणार नाही का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : नाही. उलट वेळेचा सदुपयोग होईल.

डॉ. रवींद्र भोसले : भावार्चना मानसिक पातळीवर असतात का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : नाही. भावार्चनेचा आध्यात्मिक लाभ होतो.

डॉ. रवींद्र भोसले : आपण मुद्रा केल्यावर सकारात्मक शक्ती आपल्याला कशी ग्रहण होते ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : आपण मुद्रा केल्यावर सहस्रार, आज्ञाचक्र, अशा कुंडलिनीचक्रांतून सकारात्मक शक्ती आपल्या शरिरात प्रवेश करते.

डॉ. रवींद्र भोसले : मी डोळे मिटून नमस्काराची मुद्रा करून तुमचे स्मरण करतो. तेव्हा माझ्या डोळ्यांपुढे तुमचे नमस्काराची मुद्रा केलेलेच रूप येते. यामागचे कारण काय ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : बिंब-प्रतिबिंब न्यायामुळे असे होते.

डॉ. रवींद्र भोसले : रुग्णाचे शस्त्रकर्म करत असतांना ‘मी लढत आहे’, असा भाव ठेवू का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : शस्त्रकर्म करतांना तुम्ही नामजप करा; म्हणजे देवच तुमच्या माध्यमातून शस्त्रकर्म करील.

डॉ. रवींद्र भोसले : श्री गुरुदेव, तुम्ही माझ्या मुलाला आशीर्वाद द्या. त्यासाठी मी इथे आलो आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : साधना करून पात्रता वाढल्यावर देवाचा आशीर्वाद आपोआप मिळतो !’

-डॉ. रवींद्र भोसले (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र.