इडनबर्ग – स्कॉटलंडमध्ये नवीन द्वेष गुन्हेगारी (हेट क्राईम) कायदा लागू करण्यात आला आहे. द्वेषभावनेतून केलेल्या गुन्ह्यांवर कारवाई करण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायदा पीडित समुदायांना संरक्षण प्रदान करील, असे स्कॉटिश सरकारने म्हटले आहे. या कायद्याच्या अंतर्गत वय, अपंगत्व, धर्म, लिंगभेद याविषयी पूर्वग्रहावर आधारित भेदभावापोटी अपमानास्पद वागणूक देणार्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. समाजात कुणीही भीतीने जगू नये आणि पूर्वग्रहापासून मुक्त रहाणारा सुरक्षित समुदाय निर्माण व्हावा, यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे स्कॉटलंडचे समुदाय सुरक्षामंत्री सिओबियन ब्राउन यांनी सांगितले.
‘हॅरी पॉटर’च्या लेखिका जे.के. रोलिंग आणि प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी नवीन कायद्यावर टीका केली आहे. ‘हा कायदा अभिव्यक्तीस्वातंत्र्याची हानी करणारा आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.