परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधिका भावजागृतीच्या प्रयत्नांविषयी सांगत असतांना अन्य साधकांना सुगंधाची अनुभूती येणे

‘एकदा आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या सत्संगात सौ. अनघा पाध्ये त्या करत असलेल्या भावजागृतीच्या प्रयत्नांविषयी सांगत होत्या.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

त्या वेळी मला (श्री. सुमित सरोदे यांना) सुगंध आला. त्या क्षणी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘‘सर्वांनी डोळे बंद करून कुठला गंध येत आहे का ?’, ते अनुभवा.’’ त्यांचे बोलणे संपण्यापूर्वीच मला (श्री. नीलेश कुलकर्णी यांना) सुगंध आला. त्या वेळी आम्हाला शांत वाटत होते.’

– श्री. सुमित सरोदे आणि श्री. नीलेश कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक