श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील प्राचीन मार्तंड सूर्यमंदिराचा ६०० वर्षांनंतर जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. यासंदर्भात संस्कृती विभागाच्या प्रधान सचिवांनी १ एप्रिल २०२४ या दिवशी जम्मू येथील नागरी सचिवालयात उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत अनंतनाग येथील प्राचीन मार्तंड सूर्यमंदिराच्या जीर्णोद्धाराच्या नियोजनाविषयी चर्चा केली जाणार आहे. ओडिशातील कोणार्क आणि गुजरातमधील मोढेरा याप्रमाणेच काश्मीरचे मार्तंड सूर्यमंदिर हे भगवान सूर्याला समर्पित भव्य हिंदु मंदिरांपैकी एक आहे.
१. मार्तंड सूर्यमंदिर संकुलात मंदिराचा निर्माता सम्राट ललितादित्य मुखोपाध्याय याचा पुतळा उभारण्याविषयीही या बैठकीत चर्चा होणार आहे.
२. महाराज ललितादित्य मुखोपाध्याय याने मार्तंड सूर्यमंदिर बांधले होते. ललितादित्य मुखोपाध्याय हा कर्कोटा वंशाचा राजा होता. त्याने सातव्या शतकात राज्य केले. राजतरंगिणी ग्रंथामध्ये त्याचा महिमा वर्णिला आहे.
३. सुलतान सिकंदर शाह मिरी याने हे मंदिर उद्ध्वस्त केले होते. त्याला हिंदूंच्या देवतांची मूर्ती तोडण्याची सवय होती.
४. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी मार्तंड सूर्यमंदिरात जाऊन पूजा केली आहे.