बंटवाळ (कर्नाटक) : परियालतड्का या गावात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चर्चचा पाद्री नेल्सन ओलिवेरा याच्याकडून आक्रमण करण्यात आलेल्या वृद्ध दांपत्यावर आता ख्रिस्ती समाजाने बहिष्कार घातल्याचा आरोप करण्यात आला आहे.
१. ग्रेगोरी मोंथेरो आणि फिलोमिना कोयेलो या दांपत्याने पाद्रयाविरुद्ध तक्रार करताच त्याने त्रास देणे चालू केले, असा आरोप या दांपत्याने पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले की, आरंभी चर्चशी संपर्क असलेल्या सर्व व्हाट्सअॅप गटामधून आम्हाला काढून टाकण्यात आले. नंतर गावातील समुदायातील लोकांनी अचानक आमच्याशी बोलेणे बंद केले. मंगळुरू पोलिसांवर दबाव आणून आरोपी पादरी याचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असाही आरोप या दांपत्याने केला.
२. ‘संपूर्ण मंगळुरूत आम्हाला ख्रिस्तीविरोधी असल्याचे दाखवून आमच्याविरुद्ध खोट्या तक्रारी करण्यासाठी लोकांना भडकावण्यात येत आहे; परंतु समुदायातील लोकांमध्ये जागृती वाढल्यामुळे त्यांच्या दबावापुढे कुणीही ख्रिस्ती वाकला नाही, असे दांपत्याने सांगितले.
३. याखेरीज पाद्रयाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यास या दांपत्याला साहाय्य करणारे सामाजिक कार्यकर्ते रॉबर्ट रोजा रियो आणि मारीस मस्करेंहास यांनाही लक्ष्य करण्यात येत आहे.
४. ‘दांपत्याला साहाय्य केले; म्हणून पुत्तुरू चर्चच्या पॅरिष कौन्सिलमधून मला काढून टाकण्यात आले आहे’, असे मारीस मस्करेनस यांनी सांगितले. बिशप (वरिष्ठ पाद्री) रे. पीटर पॉल सल्डान्हा यांना पत्र लिहूनदेखील कोणतेही उत्तर आलेले नाही, असे सांगून ‘बिशप पाद्री हे आरोपी नेल्सन ऑलीवेरा यांच्या पाठीशी आहेत’, असा आरोप त्यांनी केला.
संपादकीय भूमिकाअल्पसंख्यांकांचे तारणहार म्हणवून घेणारे कर्नाटकात काँग्रेसचे सरकार याकडे लक्ष देणार का ? |