उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. श्रीकृष्ण उरकुडे हा या पिढीतील एक आहे !
‘वर्ष २०१९ मध्ये ‘कु. श्रीकृष्ण नामदेव उरकुडे उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५६ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२७.२.२०२४) ‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
कु. श्रीकृष्ण नामदेव उरकुडे याची त्याच्या वडिलांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१ नम्रता
‘कु. श्रीकृष्ण नेहमी मोठ्यांशी नम्रतेने आणि आदराने बोलतो.
२. ऐकण्याची वृत्ती
अ. त्याच्या आईने त्याला घरातील काही काम सांगितले, तरी तो कधीच नकार देत नाही. तो घरातील सर्वांचे ऐकतो.
आ. तो कधीही कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट करत नाही.
इ. त्याला साधनेविषयी सांगितलेले सूत्र तो लगेच कृतीत आणतो.
३. इतरांचा विचार
अ. घरी कुणाची प्रकृती बरी नसेल, तर तो त्यांची काळजी घेतो.
आ. आई घरी नसेल, तर तो स्वतः घर नीट ठेवतो.
४. धर्माचरण
तो प्रतिदिन सकाळी करदर्शन आणि भूमीवंदन करतो. तो प्रतिदिन टिळा लावतो आणि स्तोत्रपठण करतो. तो जेवण्यापूर्वीचा श्लोक आणि संध्याकाळी ‘शुभम्करोती’ म्हणतो.
५. राष्ट्रप्रेम
१५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी या दिवशी तो मार्गावर पडलेले राष्ट्रध्वज उचलतो.
६. साधनेची ओढ
तो व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित करतो. तो प्रतिदिन झोपण्यापूर्वी त्याच्या चुका लिहितो आणि चुकांवर प्रायश्चित्तही घेतो.
७. प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा
‘कधी त्याला घरी एकटे रहावे लागले, तर तो म्हणतो, ‘‘प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. डॉक्टर माझ्या समवेत आहेत. त्यामुळे मला भीती वाटत नाही.’’
८. भाव
देवपूजा करतांना तो ‘साक्षात् भगवान श्रीकृष्ण इथे असून मी त्याला अंघोळ घालत आहे. तो माझी प्रत्येक कृती बघत आहे’, असा भाव ठेवून देवपूजा करतो.
९. स्वभावदोष
धांदरटपणा, मनमोकळेपणाने न बोलणे, आळशीपणा
१०. कृतज्ञता
‘हे गुरुदेवा, तुमच्याच अपार कृपेने हा दैवी बालक आम्हाला मुलगा म्हणून लाभला’, यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– श्री. नामदेव उरकुडे (श्रीकृष्णचे वडील), राजुरा, जिल्हा चंद्रपूर (१६.३.२०२३)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |