मुंबई – अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्याचे वृत्त पाहून मला वाईट वाटले. अरविंद केजरीवाल यांच्यासारखा माणूस कधी काळी माझ्यासमवेत काम करत होता. आम्ही दारूविरोधात आवाज उठवला होता. तोच माणूस आता मद्य धोरण बनवत आहे, हे पाहून मला पुष्कळ दुःख झाले. आपण सत्तेसमोर काहीच करू शकत नाही. पुढे जे काही होईल, ते कायद्याने होईल, अशी आपण अपेक्षा करूया, अशी प्रतिक्रिया भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारे श्री. अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना झालेल्या अटकेविषयी दिली आहे. यापूर्वी देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांच्या समवेत तत्कालीन काँग्रेस सरकारविरोधात देशव्यापी आंदोलन केले होते.
‘कर्म प्रधान विश्व रचि राखा, जो जस करहि सो तस फल चाखा ।’ (‘हे विश्व कर्मप्रधान असून जी व्यक्ती जसे कर्म करते, त्या व्यक्तीला तसंच फळ मिळते’) असे कुमार विश्वास यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.