देशासाठी जगायचे आणि देशासाठीच मरायचे ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – ‘सी.एन्.एन्. न्यूज १८’ने आयोजित केलेल्या ‘रायझिंग इंडिया समिट’ला संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्याला जगायचे असेल तर देशासाठी, मरायचे असेल तर देशासाठी. ‘प्रथम राष्ट्र’ हा उद्देश समोर ठेवून आपल्याला पुढे जायचे आहे.

सौजन्य Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,

१. आमच्या सरकारने ‘पुढील २५ वर्षांत काय कृती करणार’, याचे नियोजन केले आहे. आम्ही सत्तेत आल्यावर तिसर्‍या कार्यकाळातील पहिल्या १०० दिवसांत कोणत्या योजना राबवायच्या ?, हेही आम्ही निश्‍चित केले आहे.

२. गेल्या १० वर्षांत पुष्कळ पालट झाले आहेत. आज आपण विकसित आणि आत्मनिर्भर भारताविषयी बोलत आहोत.

३. अवघ्या १० वर्षांत २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. भारताची अर्थव्यवस्था १० व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आली आहे.

४. सरकारने ४ कोटी बनावट शिधापत्रिका शोधल्या आहेत. जे खरोखर गरीब होते, त्यांना रेशन मिळत नव्हते. आज प्रत्येक गरीब व्यक्तीला रेशन मिळते.