भारती विद्यापिठाच्या वसतीगृहातील घटना !
पुणे – भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहामध्ये रहाणार्या १९ वर्षीय युवतीने छेडछाडीला कंटाळून स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली. तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार चालू असतांना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वसतीगृहाच्या भोजनालयामध्ये काम करणारा कर्मचारी सतीश जाधव हा तिला अश्लील संदेश पाठवत होता, तसेच तिच्या खोलीमध्ये रहाणारी मुस्कान सिद्ध ही तिला सतत त्रास देत होती. या दोघांकडून होणार्या त्रासाला कंटाळून युवतीने ७ मार्च या रात्री ९ वाजता स्नानगृहामध्ये स्वत:ला पेटवून घेतले. (विद्यार्थिनींनी त्यांचे मनोबल वाढण्यासाठी धर्माचरण करण्यासह स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणेही आवश्यक आहे. – संपादक)