जुन्नर (पुणे) येथे कत्तलीसाठी आणलेल्या ११ गोवंशियांची सुटका, धर्मांधावर गुन्हा नोंद !


जुन्नर (जिल्हा पुणे)
– येथील शुक्रवार पेठेत रहाणार्‍या असीम कुरेशी याने घराबाहेर कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ५४ सहस्र रुपये मूल्याच्या ११ गोवंशियांची सुटका करून त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात आली. यात सहा महिने ते दीड वर्षे वयाच्या बैलांचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.

कुरेशी याच्याकडे पशूवैद्यकीय अधिकार्‍यांचे प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले. याविषयी चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी जनावरांची सुटका केली. या प्रकरणी पोलीस शिपाई दादाभाऊ पावडे यांनी तक्रार दिली असून पोलिसांनी कुरेशी याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. (गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही धर्मांध गोवंशियांना कत्तलीसाठी आणतात, यातून ते कुणालाही जुमानत नाही, हे लक्षात येते. कायद्याची कार्यवाही कठोर आणि परिणामकारक व्हायला हवी. – संपादक)