मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – बाबा बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री हे सध्या उत्तरप्रदेशातील मुरादाबादमध्ये असून येथे त्यांची हनुमान कथा चालू आहे. येथे त्यांनी मुरादाबादचे नाव पालटून ‘माधवनगर’ करण्याची मागणी केली. यासाठी त्यांनी अनेक कारणेही दिली आहेत. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले की, भारतात अनेक नावे पालटली आहेत. फैजाबादचे नाव पालटून अयोध्या होऊ शकते, अलाहाबादचे नाव पालटून प्रयागराज होऊ शकते, तर मग मुरादाबादचेही नाव पालटून त्याचे ‘माधवनगर’ असे नामकरण केले पाहिजे.
१. धीरेंद्र शास्त्री म्हणाले, ‘‘जेथे सिद्धबली हनुमान मंदिर, हरिहर मंदिर, गडगंगा, श्री शितलामाता मंदिर, श्री कालकामाता मंदिर, नीम करोली बाबा मंदिर इत्यादी मंदिरे आहेत आणि जेथे माता गंगा प्रकट झाली, अशा शहराला माधवनगर म्हणायला हवे.’’
२. यापूर्वी धीरेंद्र शास्त्री यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांच्यासमोर चंद्रखुरी शहराचे नाव पालटून ‘कौशल्या धाम’ करावे, असा प्रस्ताव ठेवला होता.
३. धीरेंद्र शास्त्री यांनी मध्यप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना राजधानी भोपाळचे नाव पालटून ‘भोजपाल’ केले तर चांगले होईल, असेही आवाहन केले होते.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुसलमान आक्रमकांनी शहरांना दिलेली नावे पालटून त्यांची मूळ नावे परत ठेवली आहेत. त्यामुळे मुरादाबादचे नाव पालटले जाईल, अशी हिंदूंना अपेक्षा आहे ! |