श्रीकृष्णजन्मभूमीचे प्रकरण
मथुरा (उत्तरप्रदेश) – श्रीकृष्णजन्मभूमी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मशीद कमिटीची याचिका फेटाळली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणाशी संबधित १५ खटले एकत्र चालवत सुनावणी करण्याचा निर्णय दिला होता; मात्र मशीद कमिटीने उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
Shri Krishna Janmabhoomi Case
(Mathura) – The #SupremeCourt has dismissed the petition of the mosque committee opposing the consolidation of all cases for a joint hearing.#ReclaimTemples@AshutoshBhriguV @Vishnu_Jain1 pic.twitter.com/9FIQf642VQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 19, 2024
सर्व प्रकरणे एकाच प्रकारची असून त्याचे पुरावेही समान असल्याने त्यांच्या आधारे निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयाचा वेळ वाचवण्याच्या उद्देशाने यांवर एकत्र सुनावणी घेण्याचा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता.