‘दारुल उलूम देवबंद’ इस्लामी संघटनेवर तात्काळ बंदी आणावी ! – धीरज राऊत, हिंदु जनजागृती समिती

अकोला येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !

आंदोलनात सहभागी धर्मप्रेमी

(‘दारुल उलूम देवबंद’ – उत्तरप्रदेशातील इस्लामी शिक्षण संस्था)
(‘गझवा-ए-हिंद’ म्हणजे भारतावर आक्रमण करून मुसलमानांनी राज्य करणे)

अकोला, १८ मार्च (वार्ता.) – दारुल उलूम देवबंदने ‘गझवा-ए-हिंद’चा (इस्लामीस्तानचा) फतवा काढला असल्याने भारतात अशांतता निर्माण होऊ शकते, गृहयुद्धाची स्थितीही निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारने या इस्लामी संघटनेवर तात्काळ बंदी आणावी, तसेच या संघटनेच्या सर्व दोषी पदाधिकार्‍यांवर गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्यात यावी, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. धीरज राऊत यांनी केले. समितीच्या वतीने येथे झालेल्या आंदोलनात ते बोलत होते.

बंगालमधील अराजक पहाता तेथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करा ! – उदय महा, संघटनमंत्री, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

बंगाल राज्यात गेली अनेक वर्षे हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत. नुकतेच संदेशखाली येथील हिंदु महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण, मंदिरांवर आक्रमण करून मूर्तीची तोडफोड करणे, हिंदुत्वनिष्ठ व्यक्तींच्या हत्या, हिंदु उत्सवांच्या वेळी दंगली करणे, दहशत पसरवणे हे बंगालमध्ये नित्याचेच झाले आहे. आज ही परिस्थिती पहाता बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी.

शिवसेना नेहमीच हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या समवेत उभी रहाते ! – योगेश अग्रवाल, शिवसेना महानगर अध्यक्ष, अकोला

पू. भिडेगुरुजींच्या गाडीवर झालेले आक्रमण म्हणजे केवळ त्यांच्यावरील आक्रमण नसून ते तुमच्या-आमच्या, हिंदूंच्या अस्मितेवर झालेले आक्रमण आहे. काही हिंदुविरोधी संघटना हिंदूंना उपद्रव करत आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन केले पाहिजे.

हिंदू संघटित न झाल्यास भविष्य कठीण ! – अधिवक्ता पप्पू मोरवाल, अध्यक्ष, श्रीराम सेना, अकोला.

हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या आजच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे, हिंदू संघटित झाले पाहिजेत, अन्यथा हिंदूंचे भविष्य कठीण आहे.

• श्री. संजय ठाकूर, अध्यक्ष, राष्ट्रजागृती मंच, अकोला – केंद्रीय पुरातत्व विभागच्या अंतर्गत संरक्षित हिंदु धार्मिक स्थळांमध्ये पूजा-अर्चा आदी धार्मिक कृती करण्यावर असलेले सर्व निर्बंध उठवून पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व वास्तूंवर किंवा परिसरात झालेली अतिक्रमणे तात्काळ हटवा !

• अधिवक्त्या श्रुती भट – सोनई (जिल्हा नगर) येथील ‘विनियार्ड ब्लेस्ड चर्च’मध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्‍या ३ पाद्र्यांवर कठोर कारवाई करा !

• सौ. आनंदी वानखडे, सनातन संस्था – पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर भ्याड आक्रमण करणार्‍यांचा सूत्रधार शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करा !

आंदोलनात सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते, तसेच धर्मप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी आंदोलनात सहभागी श्री. योगेश अग्रवाल, तसेच अधिवक्ता पप्पू मोरवाल यांनी सक्रीय सहभाग घेतला होता.


आंदोलनस्थळी आलेले अनुभव !

दारुल उलूम देवबंद संस्थेचा लोगो.

१. धर्मांध मुसलमानाने केले आंदोलनाचे चित्रीकरण !

आंदोलनाच्या वेळी २-३ मुसलमान काही अंतरावर बसून विषय ऐकत होते. एका धर्मांध मुसलमानाने सनातनच्या साधकांकडे आंदोलनाविषयी विचारणा केली. हिंदुत्वनिष्ठ श्री. संजय ठाकूर यांनी त्याला हटकल्यावर तो रिक्शात बसून आंदोलनाचे चित्रीकरण करत होता. पोलिसांनी त्याचा भ्रमणभाष घेतल्यावर तो पोलिसांशी उद्धटपणे बोलू लागला. साध्या पोशाखातील पोलिसांनी त्याच रिक्शातून त्याला पोलीस ठाण्यात नेले. ते खरे पोलीस असल्याचे समजल्यावर तो पोलिसांच्या हाता-पाया पडू लागला. मुख्य पोलीस अधिकार्‍यांनी त्याला खडसावले. त्यानंतर त्याने आंदोलनाचे केलेले चित्रीकरण भ्रमणभाषमधून पुसून टाकले. त्याची निश्चिती करून त्याला समज देऊन सोडले.

२. आंदोलनस्थळाच्या समोरील इलेक्ट्रिक खांबावर मोठ्या प्रमाणात स्पार्क झाला. खांबावरील तारा तुटल्या. लोक घाबरून सैरावैरा ओरडत इकडे तिकडे पळू लागले; पण सनातनचे साधक सर्वांना स्थिर राहून ‘तुम्ही ओरडू नका, पळून जाऊ नका, काही झाले नाही’, असे सांगत होते.