‘व्यष्टी साधना करणार्या साधकाला त्याच्या साधनेमध्ये गुरूंच्या सगुण रूपाला अधिक महत्त्व असते. त्यामुळे त्याला गुरूंना सतत भेटावे, त्यांच्याशी बोलावे, असे वाटते. तो गुरूंना भेटल्यावर त्याचे स्वतःच्या साधनेच्या अनुभव आणि अनुभूती यांच्या संदर्भातील बोलणे अधिक असते. समष्टी साधना करणार्यास गुरूंची शिकवण आणि त्यांचे कार्य अधिक जवळचे वाटत असते. त्याला गुरूंच्या सगुण रूपाची ओढ न रहाता, त्यांची शिकवण अधिकाधिक कशी आत्मसात् करू आणि त्यांचे कार्य अधिकाधिक कसे वाढवू ? याची तळमळ अधिक असते. त्यामुळे गुरु सगुणातून भेटले, तरी कार्याच्या माध्यमातून तो गुरूंना कशा प्रकारे अनुभवतो ? याबाबत बोलणे असते आणि त्याचे बोलण्याचेही प्रमाण अल्पच असते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले