पुणे – जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ७४ शाळांमध्ये एकही विद्यार्थी नसल्याने या शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. या सर्व शाळा जिल्ह्याच्या अतीदुर्गम आणि डोंगराळ भागांतील असल्याचे जिल्हा परिषदेने सांगितले. विनामूल्य आणि सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदींच्या (प्रावधानांच्या) अन्वये प्रत्येक २० विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक असणे आवश्यक आहे; मात्र जिल्ह्यातील एकूण ३ सहस्र ७१७ जिल्हा परिषद शाळांपैकी १ सहस्र शाळांमधील पटसंख्या १० पेक्षाही अल्प आहे.