|
ठाणे – मुंबई शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या उत्तन भागातील एका सरकारी भूमीवर अनधिकृतपणे हजरत सय्यद बालेशाह पीर दर्गा बांधल्याचा आरोप करण्यात आला आहे. ७० सहस्र फुटांवर १०० फुटांचा दर्गा अनधिकृतपणे बांधण्यात आला आहे.
यासंदर्भात मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडे सातत्याने तक्रारी येत होत्या; पण ठोस कारवाई झाली नाही. दर्ग्याविषयी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. दर्ग्याच्या संचालकांवर बेकायदा बांधकाम आणि सरकारी भूमीवर नियंत्रण मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. दर्गा ट्रस्टला २२ मार्चपर्यंत बेकायदा बांधकाम पाडण्यास सांगण्यात आले असून तसे न केल्यास प्रशासन हे बांधकाम पाडणार आहे, असे न्यायालयाने सांगितले.
१. वर्ष १९९३ मध्ये बाँबस्फोटासाठी आणलेले स्फोटक साहित्य रायगडमधील शेखाडीच्या समुद्रकिनार्यावर उतरवण्यात आले होते. वर्ष २००८ मध्ये मुंबईत दहशत माजवणारे १० आतंकवादी समुद्रमार्गे मुंबईत घुसले होते.
२. ठाण्यातील उत्तन दर्गा परिसर हासुद्धा समुद्रकिनारीच आहे. उत्तन दर्ग्याच्या आजूबाजूच्या जागेवर अवैध कब्जा करण्यात आला आहे. दर्ग्याच्या मौलवींवर अल्पवयीन मुलीचे धर्मांतर करून तिच्याशी निकाह करणे, दर्ग्यामध्ये ८ अवैध घुसखोरांना आश्रय देणे, तळघरात अमली पदार्थांचे अड्डे बनवणे, आजूबाजूच्या खारफुटीच्या जंगलातील झाडे तोडणे, असे विविध आरोप आहेत.
३. गेल्या अनेक वर्षांपासून दर्गा ट्रस्टने हळूहळू वनभूमीवर नियंत्रण मिळवले आहे. दर्ग्याजवळ बोटी फिरतात; पण तेथील परिसर निर्जन आहे. त्यामुळे हा समाजकंटकांचा अड्डा बनला आहे.
४. दर्ग्याविषयी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, तेव्हा प्रशासनाला बेकायदा बांधकाम पाडण्याची नोटीस बजावण्यात आली होती.
५. दर्गा ट्रस्टकडून दर्ग्यावर होणारे आरोप अयोग्य असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या मते उत्तनचा हा दर्गा पोर्तुगीज राजवटीचा आहे.
संपादकीय भूमिका
|