८ दानपेट्यांतील ४० सहस्र रुपये चोरले !
नवी मुंबई – येथील सेक्टर १३ मधील अयप्पा मंदिरात घुसून मंदिरातील ८ दानपेट्या फोडून त्यांतील ४० सहस्र रुपयांची रोख रक्कम चोरून नेण्यात आली. हे चोर सीसीटीव्ही कॅमेर्यात दिसून येत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. मंदिराच्या मुख्य दाराला कुलूप लावलेले होते; मात्र ३ चोरट्यांनी मंदिराच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून मंदिरच्या आवारात प्रवेश करून चोरी केली.
संपादकीय भूमिकामंदिरात वारंवार होणार्या चोर्या हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांची अपरिहार्यता दर्शवतात ! |