सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे आयोजित शिबिराच्या वेळी आलेल्या अनुभूती

‘ १७ ते २१.११.२०२३ या कालावधीत सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे युवा साधना शिबिरामध्ये मला उपस्थित रहाण्याची सुवर्णसंधी मिळाली. त्या वेळी मला पुढील अनुभूती आल्या.

कु. देवश्री दयानंद जड्यार

१. आश्रम पहातांना शिकायला मिळालेली सूत्रे

अ. आश्रम दर्शनाच्या पूर्वी मी प्रार्थना केली. ‘आश्रमातील प्रत्येक ठिकाण, प्रत्येक कोपरा आणि प्रत्येक कण यांमध्ये गुरुमाऊली आहेत. आश्रमातील चैतन्य मला भावाच्या स्तरावर ग्रहण करता येऊ दे.’

आ. अन्नपूर्णा कक्षामधील देवघरामध्ये श्री अन्नपूर्णामातेची मूर्ती आहे. मला तिचे दर्शन झाले. नंतर स्वयंपाक बनवण्याची यांत्रिक साधने बघितली. मला त्यांच्याकडे पाहून प्रसन्न वाटले. एवढ्या सगळ्या साधकांचा स्वयंपाक ते वेळेत करतात, याचे मला कौतुक वाटत होते. त्यांच्याकडून ‘वेळेचे पालन करणे’, हा गुण मला शिकायला मिळाला.

इ. धान्य निवडणार्‍या साधकांकडून मला ‘एकाग्रता’ हा गुण शिकायला मिळाला.

ई. ध्वनीचित्रीकरण कक्षात (स्टुडिओ) गेल्यावर माझे मन पूर्ण निर्विचार झाले. तिथे अद्भुत शांतता होती आणि मला तिथे चैतन्याचा अनुभव येत होता. तेथे कैलास पर्वतासारखा गारवा जाणवत होता. मला तेथे गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते. ‘ध्वनीचित्रीकरण कक्षामधून बाहेर पडू नये. तेथेच शांत बसून रहावे’, असे मला वाटत होते.

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे दर्शन झाल्यावर भावजागृती होणे

शिबिराच्या शेवटच्या दिवशी डोळे बंद करून प्रार्थना करतांना ‘दिव्य शक्तीचे आगमन झाले आहे’, असे मला जाणवले. मी डोळे उघडून पाहिले, तर मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे दर्शन झाले. तेव्हापासून ते शिबिराचा समारोप होईपर्यंत माझी सतत भावजागृती होत होती.

श्रीगुरुदेवांच्या कृपेमुळे मला हे अनुभव लिहिता आले, यासाठी श्रीगुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. देवश्री दयानंद जड्यार (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे), सावर्डे, जि. रत्नागिरी. (१६.१२.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक