पुणे – माझी पुणे येथून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती; पण माझ्याविषयी नकारात्मक गोष्टी राज ठाकरेंपर्यंत पोचवण्यात आल्या. माझ्यावर स्वकेंद्री राजकारण करण्याचे आरोप केले गेले. मी मनसेत परतण्याचे दोर कापले आहेत. मी मनसेचा संस्थापक सदस्य होतो; पण माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून वागणुकीवर आक्षेप घेतले जात होते. अशा ठिकाणी न राहिलेलेच बरे, असे वसंत मोरे यांनी १२ मार्चला मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.
अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा … pic.twitter.com/25IQRaLfXQ
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) March 12, 2024