जेजुरी (जिल्हा पुणे) – महाशिवरात्रीनिमित्त श्री खंडोबा मंदिरात आणि शिखरावर असणारे स्वर्गलोकी, भूलोकी आणि पाताळलोकी (त्रैलोक्य) शिवलिंग दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. शिवलिंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील लाखो भाविकांनी गडावर गर्दी केली. गडाच्या मुख्य मंदिराच्या शिखरावरील शिवलिंग हे स्वर्गलोकी शिवलिंग मानले जाते. मुख्य मंदिरातील स्वयंभू लिंग हे भूलोकी शिवलिंग आणि गाभार्यातील मुख्य मंदिराशेजारी असणार्या गुप्त मंदिरातील तळघरातील शिवलिंग पाताळलोकी शिवलिंग मानले जाते.
मुख्य मंदिरातील स्वयंभू शिवलिंग प्रतिदिन खुले असते, तर मंदिराच्या शिखरावरील आणि मुख्य मंदिरातील तळघरातील शिवलिंग वर्षातून एकदा केवळ महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी उघडले जाते.