मथुरा – येथील श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणी मुसलमान पक्षाने अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवर १३ मार्चला सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती मयांक जैन यांच्या न्यायालयात ही सुनावणी होईल. मुसलमान पक्ष वाद क्रमांक १७ आणि १८ यांप्रकरणी त्याची बाजू मांडणार आहे. त्यानंतर हिंदु पक्षाला वाद क्रमांक १ ते १८ यांवर त्याची बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे. मुसलमान पक्षाने ‘पूजा-उपासना कायदा १९९१’च्या आधारे हे प्रकरण न्यायप्रविष्ट करून घेण्यास विरोध दर्शवला आहे.
श्रीकृष्णजन्मभूमीतील विहिरीच्या परिसरात माता शीतला सप्तमी आणि अष्टमी या दिवशी होणार्या पूजेला अनुमती देण्याविषयी सुनावणी होण्याची शक्यता आहे, असे श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत अशुतोष पांडेय यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.