ओतूर (जिल्हा पुणे) येथे १ सहस्र ५०० किलो गोमांसाची अवैध वाहतूक करणार्‍या धर्मांधास अटक !

भाजीखाली दडवून ठेवले होते गोमांस !

ओतूर (जिल्हा पुणे) – जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे पोलिसांनी गोमांस वाहतूक प्रकरणी नासिर शेख याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे, तसेच १ सहस्र ५०० किलो गोमांस असलेला एक टेंपोही जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक एल्.जी. थाटे यांनी दिली.

अवैधपणे गोमांस घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यांनी ही गोष्ट ओतूर पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार ९ मार्चला मुंबईच्या दिशेने वेगात जाणारा टेंपो बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि ओतूर पोलीस यांनी थांबवून त्याची पडताळणी केली. या वेळी अनुमाने १ सहस्र ५०० किलो गोमांस भाजीखाली दडवून ते विक्रीसाठी मुंबईकडे घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी ऋषिकेश शेलार यांनी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.

संपादकीय भूमिका 

गोमांसाची वारंवार होणारी अवैध वाहतूक आणि तस्करी थांबवण्यासाठी पोलीस ठोस उपाययोजना कधी काढणार ? गोमांसाची अवैध वाहतूक करणार्‍या धर्मांधांवर जरब बसेल, असा धाक पोलीस निर्माण करणार कि नाही ?