Shoot Pro-Pakistan Supporters : कुणी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देत असेल, तर त्यांना सरळ गोळ्या घाला ! – मंत्री के.एन्. राजन्ना, कर्नाटक

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे मंत्री के.एन्. राजन्ना यांचे विधान !

के.एन्. राजन्ना

बेंगळुरू (कर्नाटक) – विधानसभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्यानंतर काय झाले ? काँग्रेसच्या प्रतिमेला काही धक्का बसलेला नाही. उलट आमची प्रतिमा उजळून निघाली आहे. (याला म्हणतात ‘पडलो, तरी नाक वर’ ! – संपादक) जर कुणी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत असेल, तर त्यांना सरळ गोळ्या घाला. त्यात काहीच अडचण नाही, असे विधान काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे मंत्री के.एन्. राजन्ना यांनी केले. काँग्रेसचे नेते सय्यद नसीर हुसेन यांचा राज्यसभेच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर कर्नाटक विधानसभेच्या परिसरात त्यांच्या समर्थकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या होत्या. या प्रकरणी आतापर्यंत ३ जणांना अटक करण्यात आली आहे. ‘घोषणाबाजीच्या प्रकरणातील गुन्ह्यामध्ये काँग्रेसचे नवनियुक्त खासदार सय्यद नसीर हुसेन यांच्याही नावाचा समावेश करावा’, अशी मागणी भाजपने केली आहे. तसेच ‘चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना राज्यसभेची शपथ देऊ नये’, अशीही विनंती राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड यांना करणार असल्याचे भाजपने म्हटले आहे.

राजन्ना यांनी पूर्वी उत्तरप्रदेश सरकारकडून गुन्हेगारांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझरद्वारे करण्यात येणार्‍या कारवाईचे समर्थनही केले होते. ते म्हणाले होते की, बुलडोझरचा वापर करून आरोपींची घरे पाडणे यासारख्या सरकारी कारवायांमुळे अधिक लोकसंख्या असणार्‍या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात येणार असेल, तर आम्ही अशा कारवाईला विरोध करणार नाही. (काँग्रेसच्या राज्यात अशी कारवाई का केली जात नाही ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

पाकप्रेमी काँग्रेसवाल्यांना हे मान्य आहे का ?