‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वागतकक्षाच्या जागेसमोरील भिंतीवर सनातन-निर्मित श्रीकृष्णाचे चित्र आहे. साधारण २ वर्षांपूर्वी मी श्रीकृष्णाच्या चित्रासमोर उभा राहून एक प्रयोग केला होता. तेव्हा श्रीकृष्णाच्या चित्राच्या उजव्या बाजूला जात असतांना मी श्रीकृष्णाकडे पाहिले. त्या वेळी मला त्याची बुबुळे स्थुलातून माझ्याकडे वळतांना दिसली. त्यानंतर श्रीकृष्णाच्या चित्राच्या डाव्या बाजूला जात असतांना मी श्रीकृष्णाकडे पाहिले. तेव्हाही मला त्याची बुबुळे स्थुलातून माझ्याकडे वळतांना दिसली.
२२.१०.२०२३ या दिवशी मी श्रीकृष्णाच्या चित्रासमोर एका जागी स्थिर उभा राहिलो. तेव्हा मला त्या चित्रातील बुबुळांची हालचाल होतांना दिसली. पूर्वी श्रीकृष्णाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला गेल्यावर त्याच्या बुबुळांची हालचाल स्थुलातून दिसून येत होती; परंतु आता तसे न करता स्थिर राहूनही त्याच्या बुबुळांची हालचाल दिसून येते. यावरून ‘श्रीकृष्णाच्या चित्रात पूर्वीच्या तुलनेत आणखी सजीवता आली आहे’, असे मला जाणवले. त्या चित्राचे आणखी एक वैशिष्ट्य, म्हणजे श्रीकृष्णाच्या चित्रातील डोळे इतके सुंदर आहेत की, ‘आपण त्याच्या प्रेमात कधी पडलो ?’, हेही आपल्याला समजत नाही.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |