पुरी (ओडिशा) जगन्नाथ मंदिरात घुसलेल्या २ बांगलादेशी नागरिकांना पकडले !

पुरी (ओडिशा) – जगन्नाथ मंदिरात अनधिकृतपणे प्रवेश केल्याच्या प्रकरणी ओडिशा पोलिसांनी २ बांगलादेशी नागरिकांना कह्यात घेतले आहे. ३ मार्च या दिवशी विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काही बांगलादेशी नागरिकांना मंदिरात जातांना पाहिले. त्यानंतर त्यांनी सिंहद्वार पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. मंदिराच्या नियमांनुसार येथे केवळ हिंदूच प्रवेश करू शकतात. अहिंदूंनी प्रवेश केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते.

पुरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुशील मिश्रा म्हणाले की, आम्हाला काही अहिंदू बांगलादेशी मंदिरात घुसल्याची तक्रार मिळाली. आम्ही २ बांगलादेशींना कह्यात घेतले असून त्यांची चौकशी चाल आहे. चौकशीत एक जण हिंदु असल्याचे उघड झाले. येथे ९ पैकी ४ जण मंदिरात घुसले होते.

सौजन्य  Kanak News

संपादकीय भूमिका 

बांगलादेशी नागरिकांना देशातून हाकलून न लावल्याचा परिणाम ! त्यांना बाहेर काढण्याविषयी कोणतेही सरकार प्रयत्न करत नाही, हे लक्षात घ्या !