लंडन (ब्रिटन) – ब्रिटनने त्याच्या देशात येऊ इच्छिणार्या अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इंडोनेशिया देशांतील धर्मांध इस्लामी धार्मिक नेत्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. या संदर्भात ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी योजना आखली आहे. या योजनेंतर्गत एक सूची बनवण्यात येणार आहे. यात असलेल्या लोकांना ब्रिटनमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. हे लोक ब्रिटीश व्हिसासाठी अर्ज करताच, त्यांची नावे संगणक प्रणालीद्वारे तपासली जातील. बंदी असलेल्यांच्या सूचीमध्ये त्यांचा समावेश झाल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांना प्रवेश मिळणार नाही.
१. इस्रायल-हमास युद्ध चालू झाल्यापासून ब्रिटनमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ अनेक निदर्शने झाली. पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट झाली. ब्रिटीश खासदारांना उघडपणे धमक्या देण्यात आल्या.
२. अलीकडेच ब्रिटीश सरकारचे सल्लागार लॉर्ड वॅले यांनी एका अहवालात म्हटले होते की, डावे आणि मूलतत्ववादी गट इस्लामी गटांशी हातमिळवणी करत असून ते ब्रिटनला धोका निर्माण करण्याचा कट रचत आहेत. साम्यवादी आणि इस्लामी कट्टरपंथी आता समान धोकादायक आहेत.
३. ब्रिटनच्या गृहमंत्रालयाने एक निवेदन प्रसारित करत म्हटले होते की, ब्रिटनमध्ये कट्टरतावादाला थारा नाही. कट्टरतावाद आम्ही सहनही करणार नाही. अलीकडच्या काही महिन्यांत काही लोकांनी हिंसाचार पसरवण्याचा कट रचला होता. अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी आम्ही पोलिसांना मोकळीक दिली आहे.
४. ब्रिटनचे माजी गृहसचिव नुकतेच म्हणाले होते की, जर कट्टरपंथी गटांवर बंदी घातली नाही, तर देशाच्या सुरक्षेसमोर गंभीर धोका निर्माण होईल.
संपादकीय भूमिकाभारतात अशा प्रकारच्या धर्मांधांना देशातून बाहेर हाकलून देण्याची आवश्यकता आहे ! |